Amos 6:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने, माझ्या प्रभूने, स्वत:ची शपथ घेतली. सर्वशक्तिमान परमेश्वर देवाने अशी शपथ घेतली, “याकोबला ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो, त्या गोष्टींचा मला तिटकारा करतो. त्याच्या जबूत मनोऱ्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी शत्रूला ती नगरी व त्यातील सर्व काही घेऊ देईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वराने स्वतःची शपथ वाहिली; परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “मी याकोबाच्या वैभवाचा तिरस्कार करतो, त्याच्या महालांचा मी तिटकारा करतो, हे नगर व त्यातील सर्व मी इतरांच्या हाती देईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सार्वभौम याहवेहनी स्वतः शपथ घेतली आहे—याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर घोषणा करतात: “याकोबाच्या गर्वाचा मी तिरस्कार करतो आणि त्यांचे किल्ले मी घृणास्पद मानतो; मी या शहराला आणि तिच्यातील सर्वकाही शत्रूंच्या हाती देईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपलीच शपथ वाहीली आहे की, “मी याकोबाच्या अभिमानाचा तिरस्कार करतो, त्याच्या किल्ल्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी ती नगरी व त्यातील सर्वकाही शत्रूच्या हाती देईल.”