Amos 7:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण परमेश्वर म्हणतो, ‘तुझी बायको गावची वेश्या होईल. तुझी मुलेमुली तलवारीने मरतील. दुसरे लोक तुमची भूमी घेऊन तिची आपापसात वाटणी करतील. तू परदेशात मरशील इस्राएलच्या लोकांना निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी पत्नी शहरात वेश्या होईल, तुझे पुत्र व कन्या तलवारीने मरतील, तुझी जमीन मोजण्यात येईल आणि सूत्राने विभागली जाईल, आणि तू स्वत: अपवित्र देशात मरशील. इस्राएलचे लोक निश्चितच आपल्या देशातून दूर बंदिवासात गुलाम म्हणून जातील.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी पत्नी गावची वेश्या होईल; तुझी मुले-मुली तलवारीने मरतील, तुझी भूमी सूत्राने विभागीत करण्यात येईल, तू अपवित्र जागी मरशील, इस्राएलाच्या लोकांस निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”