Amos 8:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुमचे उत्सव शोकदिनांत बदलीन. तुमची सर्व गाणी ही मृतांसाठीची शोकागीते होतील. मी प्रत्येकाला शोकप्रदर्शक कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. एकुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणपाट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन; कोणी एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन, आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुमचे धार्मिक उत्सव शोकामध्ये उलटवेन आणि तुमची सर्व गीते विलापात बदलून टाकीन. मी तुम्हा सर्वांना गोणपाट घालेन आणि तुमचे मुंडण करेन. मी तो काळ एकुलत्या एक मुलासाठी विलाप करण्यासारखा आणि त्याचा शेवट कडू दिवसासारखा करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुमचे उत्सव पालटून शोक असे करीन, आणि तुमची सर्व गाणी पालटून विलाप अशी करीन. मी प्रत्येकाला गोणताटाचे कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. ए कुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”