Amos 9:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर ते पकडले गेले. आणि त्यांचे शत्रू त्यांना घेऊन गेले. तर मी तलवारीला आज्ञा करीन. आणि ती त्यांना तेथे ठार मारील. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन हे खरे, पण त्यांना त्रास कसा होईल हे मी पाहीन. त्यांचे भले कसे होईल, हे मी पाहणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ते शत्रूंपुढे पाडाव होऊन गेले असले, तरी तेथे मी तलवारीला आज्ञा करीन म्हणजे ती त्यांना वधील; मी त्यांच्याकडे दृष्टी लावीन, ती त्यांच्या वाइटासाठी असेल, बर्यासाठी नव्हे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जरी शत्रूंनी त्यांना कैद करून बंदिवासात नेले, तरी मी तलवारीला त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईन. “मी त्यांच्यावर माझी नजर ठेवेन ती तर हानीसाठी असणार भल्यासाठी नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते जरी आपल्या वैऱ्यांपुढे पाडावपणात गेले, तर तेथून मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना ठार मारील. मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे, तर त्यांना त्रास कसा होईल या करीता लावीन.”