Amos 9:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेशवर, जमिनीला स्पर्श करील आणि ती वितळेल. मग देशात राहणारे सर्व लोक मृतांसाठी शोक करतील मिसरमधील नील नदीप्रमाणे भूमीवर उठेल व खाली पडेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर, ह्याने भूमीला हात लावताच ती विरघळते आणि तिच्यावरील सर्व रहिवासी शोक करतात; तिला नील नदीप्रमाणे पूर येईल; मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती पुन्हा ओसरेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रभू, सेनाधीश याहवेह— भूमीला स्पर्श करतात आणि ती विरघळून जाते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोक शोक करतात. संपूर्ण देश नाईल नदीसारखा वर येतो आणि इजिप्तच्या नदीप्रमाणे खाली बुडतो;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात, तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे, आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार व मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार.