Amos 9:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या. तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो. तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो. आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो. त्याचे नाव याव्हे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आकाशात आपल्या मंदिराचे मजले उभारतो, पृथ्वीवर त्याने आपला नभोमंडप स्थापला आहे, तो समुद्राच्या पाण्यास बोलावून ते पृथ्वीच्या पाठीवर ओततो; त्याचे नाम परमेश्वर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात आणि त्याचा पाया पृथ्वीवर ठेवतात; ते समुद्राच्या पाण्याला बोलवितात आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओततात; याहवेह हे त्यांचे नाव आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या, आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापिला आहे, जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव परमेश्वर आहे.