Colossians 1:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हांला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र लोकांसाठी राखून ठेवलेल्या वतनाचे भागीदार होण्यासाठी पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही आभार मानावेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या पित्याचे आभार मानणारे व्हा, ज्यांनी प्रकाशाच्या राज्यामध्ये असलेल्या पवित्र लोकांच्या वतनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पात्र ठरविले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि प्रकाशातील पवित्रजनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हास पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत.