Colossians 3:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गुलामांनो, तुमच्या जगिक मालकाच्या सर्व आज्ञा पाळा आणि मनुष्याला संतोषविणाऱ्या, डोळ्यांनी देखरेख करण्यासाठी नव्हे तर त्याऐवजी पूर्ण मनाने प्रभूला भिऊन आज्ञा पाळा. कारण तुम्ही प्रभूचा आदर करता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दासांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या पृथ्वीवरील धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोष देणाऱ्या नोकरांसारखे तोंडदेखलेपणाने हे करू नका, तर प्रभूविषयी तुम्हांला वाटणाऱ्या आदराने जिवेभावे करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दासांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा, माणसांना संतोषवणार्या नोकरांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दासांनो, तुम्ही पृथ्वीवरील आपल्या धन्यांचे प्रत्येक गोष्टीत आज्ञापालन करा, केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून नाही, तर सत्य मनाने प्रभूचे भय बाळगून करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दासांनो, दैहिक दृष्ट्या जे तुमचे मालक आहेत त्यांचे सर्व गोष्टींत आज्ञापालन करा. मनुष्यांना खुश करणार्या नोकरासारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.