Daniel 1:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण अश्पनज दानीएलला म्हणाला, मला, माझ्या स्वामी, राजाची भीती वाटते. तुम्हाला असे अन्न व पेय देण्याचा हुकूम राजाने दिला आहे. तुम्ही हे अन्न खाल्ले नाहीत तर तुम्ही अशक्त व आजारी दिसू लागाल, तुमच्याच वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही वाईट दिसु लागाल. राजाने हे पाहिले. तर तो माझ्यावर रागावेल आणि माझे डोकेसुध्दा कदाचित् उडवेल. माझ्या मृत्यूला मग तुम्हीच कारणीभुत व्हाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खोजांचा सरदार दानिएलास म्हणाला, “माझा स्वामीराजा ह्याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेवले आहे; त्याचा मला धाक आहे; तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावीत? राजापुढे माझे डोके उडवले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझे स्वामीराजाचे भय आहे, ज्यांनी मला तुमच्या खाण्या आणि पिण्याची देखरेख करण्यास नेमले आहे. तुमच्याबरोबरीच्या तरुणापेक्षा तुम्ही अशक्त का दिसावे? राजा तुमच्यामुळे माझे डोके उडवेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रमुख अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझा स्वामी, राजांचे भय आहे त्याने तुम्ही काय खावे व काय प्यावे ह्याची आज्ञा केली आहे, तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही अधिक वाईट का दिसावे? तुमच्यामुळे तो माझे डोके छाटून टाकेल.”