Daniel 1:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दहा दिवसानंतर तू जे तरुण राजाने दिलेले अन्न खातात, त्यांच्याबरोबर आमची तुलना करून, कोण जास्त सुदृढ दिसतात, ते तुझे तूच ठरव. मग आम्हाला काय द्यायचे ह्याचा निर्णय तुझा तूच घे. आम्ही तुझे नोकर आहोत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर आमची तोंडे पाहा; आणि राजघरचे अन्न खाणार्‍या तरुणांचीही तोंडे पाहा; मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या ह्या दासांचे कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग आम्ही कसे दिसतो याची तुलना राजाच्या मेजवानीत भोजन करणार्‍या तरुणांशी करा आणि या तुमच्या सेवकांना तुमच्या दृष्टीस जे दिसेल त्याप्रमाणे वागवा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर आमचे बाहयरुप व त्या तरुणांचे बाहयरुप व जे राजाचे मिष्ठान्न खात आहेत त्या तरुणांचे बाह्यरुप, त्यांची तुलना कर आणि तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या दासास कर.”