Daniel 1:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा जेव्हा राजाने त्यांना काही महत्वाचे विचारले, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे ज्ञान व जाण दिसून आली. त्याच्या राज्यातील ज्ञानी माणसांपेक्षा वा मांत्रिकांपेक्षा हे दहापटीने हुशार आहेत, हे राजाच्या लक्षात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांना जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्याला दिसून येई.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बुद्धीच्या आणि शहाणपणाच्या प्रत्येक बाबतीत ज्याबद्दल जेव्हा राजाने त्यांना विचारले, त्याला ते त्याच्या संपूर्ण राज्यातील सर्व जादूगार आणि ज्योतिषीच्या सल्ल्यापेक्षा दसपटीने चांगले आहेत, असे आढळून आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्ञानाच्या आणि शहाणपणाच्या बाबतीत राजाने त्यांना जे काही विचारले त्यामध्ये ते, सर्व जादूगार, भूतविद्या करणारे हयांच्यापेक्षा ते दहापट उत्तम असे संपूर्ण राज्यात राजाला आढळून आले.