Daniel 1:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजाला,सुदृढ, तरुण, ज्यांच्या अंगावर जखमेची खूण वा व्रण नाही, ज्यांच्या शरीरांत काहीही दोष नाही असे यहूदी तरुण हवे होते. ते देखणे व चाणाक्ष असावेत अशी राजाची अपेक्षा होती. त्यांनी सहजतेने पण लवकर सर्व गोष्टी शिकून राजाची सेवा करावी, अशी राजाची इच्छा होती. अश्पनजला, इस्राएलच्या त्या तरुणांना, खास्दी भाषा व लेखन शिकविण्यास सांगितले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारांत दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खास्द्यांची विद्या व भाषा शिकवावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शारीरिक दोष नसलेले तरुण पुरुष, देखणे, सर्वप्रकारच्या विद्येत निष्णात, ज्ञानसंपन्न, समजण्यास त्वरित आणि राजाच्या महालात सेवा करण्यास पात्र. त्याने त्यांना खाल्डियन भाषा व विद्या शिकवावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्यांच्या अंगी काही कलंक नाही असे निष्पाप, सुरुप, कौशल्यपुर्णतेने चतुर, ज्ञानाने परिपूर्ण आणि शक्तीवान आणि राजाच्या महलामध्ये सेवा करण्यास पात्र तेथे त्यांना खास्द्यांची शिक्षण व भाषा शिकवायला त्याने त्यास सांगितले.