Daniel 1:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दानीएलला राजाचे ते पौष्टिक अन्न व मद्य घेऊन, स्वत:ला अपवित्र करून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्याने ह्यासाठी अश्पनजची परवानगी मागितली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्‍चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण दानीएलने राजाचे अन्न व द्राक्षारस घेऊन स्वतःला भ्रष्ट न करण्याचा निर्धार केला आणि त्याने मुख्य अधिकाऱ्याला अशा प्रकारे स्वतःला भ्रष्ट न करण्याची विनंती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण दानीएलाने आपल्या मनात ठरवले की, तो स्वत:ला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसानें विटाळविणार नाही; म्हणून त्याने षंढांच्या अधिकाऱ्याला विनंती केली की, मी आपणाला विटाळवू नये.