Daniel 10:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दृष्टान्तातील माणस मला म्हणाला ‘दानीएला, देव तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी बोलेन त्यावर काळजीपूर्वक विचार कर. उभा राहा मला तुझ्याकडेच पाठविले आहे. तो असे म्हणताच मी उभा राहिलो भीतीमुळे अजूनही मी थरथर कापत होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला म्हणाला, “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने म्हटले, “हे दानीएला, परमप्रिय पुरुषा, मी जी काही वचने तुला सांगत आहे, ती लक्षपूर्वक ऐक आणि नीट उभा राहा, कारण मला तुझ्याकडे पाठविण्यात आले आहे.” आणि जेव्हा त्याने हे म्हटले, तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो दूत मला म्हणाला, “दानीएला परमप्रिय पुरुषा मी जे सांगतो ते मन लावून समजून घे; आणि स्थिर रहा, तुला हे सांगण्यासाठी मला पाठवले आहे,” जेव्हा तो हे शब्द बोलला मी थरथरत उभा राहिलो.