Daniel 10:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मी एकटाच उरलो .मी दृष्टान्त पाहात होतो. त्या दृष्टान्ताने मी सुध्दा घाबरलो. माझा धीर खचला. मृत माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे माझा चेहरा पांढराफटक पडला, मी असहाय झालो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी एकटाच राहिलो व हा मोठा दृष्टान्त पाहिला; माझ्यात काही त्राण उरले नाही. मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो; मला काहीच शक्ती राहिली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मी एकटाच राहिलो आणि हा महान दृष्टान्त पहात राहिलो; माझ्यात शक्ती उरली नाही, माझा चेहरा पांढराफटक पडला आणि मी असहाय्य झालो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भितीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहीले नाही.