Daniel 11:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उत्तरेच्या राजाची मुले युध्दाची तयारी करतील. ते मोठे सैन्य जमवितील जोरदार पुराप्रमाणे ते सैन्य चटकन देश पार करील. दक्षिणेच्या राजाच्या भक्कम किल्ल्यावरसुध्दा ते सैन्य हल्ला करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी त्याचे पुत्र लढाई करतील व मोठे लष्कर जमा करतील; ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील; ते परत येऊन लढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन थडकतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचे पुत्र युद्धाची तयारी करतील आणि प्रचंड सैन्य गोळा करतील. जे एका अप्रतिकार्य पुरासारखे पुढे जातील आणि युद्ध त्याच्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे पुत्र लढाई करतील आणि मोठे सैन्य जमवतील ते पुराप्रमाणे येत राहतील ते लढाई करून पुन्हा लढाई करून गडापर्यंत धडकतील.