Daniel 11:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हल.15 मग उत्तेरचा राजा येऊन तटांना उतार बांधून मजबूत शहर ताब्यात घेईल. दक्षिणेच्या सैन्याला हल्ला परतविण्याचे वळ असणार नाही. दक्षिणेच्या सैन्यातील शक्तिवाम सैनिकसुध्दा उत्तरेचे सैन्य थोपवायला परे पडणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा प्रकारे उत्तरेचा राजा येईल, तो मोर्चे लावून तटबंदीचे नगर घेईल; तेव्हा दक्षिणेचे बाहुबल टिकणार नाही; त्याच्या मोठमोठ्या वीरांचे काही चालणार नाही; त्यांच्यात सामना करण्याचे त्राण उरणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर उत्तरेचा राजा येईल आणि आणि वेढा बांधून तटबंदी असलेले शहर ताब्यात घेईल. दक्षिणेकडील सैन्यांना प्रतिकार करण्यास शक्ती राहणार नाही; त्यांच्या सर्वोत्तम सैन्यालाही सामना करण्याची ताकद नसेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशाप्रकारे उत्तरेचा राजा येऊन तटबंदीच्या शहराभोवती मोर्चे लावून नगर काबीज करील. दक्षिणेचे त्यापुढे काही एक चालणार नाही, त्याच्या उत्तम सैनिकही त्यापुढे शक्तीहीन होतील.