Daniel 11:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जेव्हा श्रीमंत देशांना सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो क्रूर राजा त्यांच्यावर चढाई करील.वाडवडिलांवर तो अगदी योग्य वेळी हल्ला करील. त्याच्या वाडवडिलांना यश मिळाले नाही,पण त्याला मिळेल.परभूत झालेल्या देशांतील वस्तू लूटून तो आपल्या अनुयायांना देईल.भक्कम शहरांचा पराभव व नाश करण्याचे बेत तो आखेल.त्याला यश मिळेल,पण काही काळापुरतेच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक निर्धास्त असता तो प्रांतातल्या सुपीक स्थलांवर चालून येईल आणि त्याच्या वडिलांनी व त्या वडिलांच्या वडिलांनीही केले नाही ते तो करील; तो लुटीचे धन लोकांना वाटून देईल; काही काळपर्यंत मजबूत किल्ले घेण्याची तो मसलत करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा श्रीमंतांना राज्य सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो त्यांच्यावर आक्रमण करेल आणि असे यश प्राप्त करेल की, त्याच्या पित्याने किंवा त्याच्या पित्याच्या पित्याने प्राप्त केले नसेल. तो धन, लूट आणि संपत्ती आपल्या अनुयायांमध्ये वाटून देईल. तो किल्ले पाडण्याचा कट रचेल—पण फक्त काही काळासाठी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सूचना न देता तो प्रांतातील धनवान भागात येईल आणि तो ते करील जे त्याच्या वडिलाने किंवा त्यांच्या वडीलांच्या वडीलाने केले नाही ते तो करील; आपल्या सहकाऱ्यास लूट आणि धन वाटून देईल काही काळ तो किल्ले घेण्याचे कारस्थान करील.