Daniel 11:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कित्तीमची गलबते येऊन उत्तरेच्या राजाविरुध्द लढतील. ती गलबते येताना पाहून तो घाबरेल मग तो मागे वळेल व आपला राग पवित्र करारावर काढील तो मागे फिरेल व ज्या लोकांना पवित्र कराराला अनुसरायचे सोजडून दिले आहे, त्यांना तो मदत करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण कित्तिमाची जहाजे त्याच्यावर चाल करून येतील, म्हणून तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन आपल्या मनास वाटेल तसे करील; तो परत जाईल व पवित्र करार सोडणार्यांबरोबर स्नेह करू पाहील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पश्चिमेकडील कित्तीम बेटांतील जहाजे त्याला विरोध करतील आणि त्याचे धैर्य तुटेल. मग तो पवित्र करारावर आपला रोष काढण्यासाठी परत येईल. तो परत येईल आणि पवित्र कराराचा त्याग करणार्यांवर कृपा दाखवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण कित्तीमाची जहाजे त्याच्या विरोधात येतील आणि तो निराश होऊन मागे फिरेल तो पवित्र करारावर खिन्न होऊन ज्यांनी हा करार सोडला त्यांच्यावर लक्ष लावील.