Daniel 11:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उत्तरेचा राजा त्याच्या वडिलांनी पूजलेल्या देवांची पर्वा करणार नाही. बायका पूजत असलेल्या देवताच्या मूर्तीचीही तो तमा बाळगणार नाही. तो कोणत्याच देवाला मानणार नाही. त्याउलट, तो स्वत:ची स्तुती करील आणि स्वत:चे महत्व देवतांपेक्षा जास्त वाढवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांची, स्त्रियांच्या प्रेमाची किंवा कोणाही दैवताची पर्वा करणार नाही; कारण तो स्वतःला सर्वांहून श्रेष्ठ समजेल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांचा आदर करणार नाही, किंवा स्त्रियांच्या इच्छांची पर्वा करणार नाही, किंवा कोणत्याही दैवताचा आदर करणार नाही, परंतु तो स्वतःला त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आपल्या पुर्वजाचे देव, स्त्रियांच्या प्रेमाचा किंवा कोणत्याही देवाचा सन्मान करणार नाही तो गर्वाने वागेल आणि आपणास त्या सर्वांहून उंच करील.