Daniel 11:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा उत्तरेचा राजा ह्या परक्या देवाच्या साहाय्याने भक्कम गडावर हल्ला करील. त्याला साथ देणाऱ्या परकीय राजांना तो जास्त मान देईल. पुष्कळ लोकांवर तो राज्य करतील. त्या बदल्यात तो त्यांच्याकडून पैसा वसूल करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एका परकीय दैवताच्या साहाय्याने तो मोठे मजबूत गड लढेल; जे कोणी त्याला मानतील त्यांना तो वैभवास चढवील; त्यांना पुष्कळ लोकांवर सत्ता देईल व मोल घेऊन जमीन वाटून देईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो या परकीय दैवतांच्या साहाय्याने मजबूत किल्ल्यांवर आक्रमण करेल आणि जे त्याचा राजा म्हणून स्वीकार करतील त्यांचा आदर करेल. तो त्यांना अनेक लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त करेल आणि बक्षीस म्हणून त्यांना जमीन वाटून देईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो परक्या देवाच्या मदतीने बलाढ्य दुर्गावर हल्ला करील. जे ह्याला जाणतात त्यांचा तो आदर करील त्यांना तो अनेक लोकांवर शासक नेमील व किंमतीसाठी जमिनीचे तुकडे करील.