Daniel 11:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो येताच त्याच्या राज्याचे तुकडे पडतील जगाच्या चार भागांत त्याच्या राज्याचे विभाजन होईल.त्या राजाची मुले किंवा नातवंडे ह्यांच्यात त्याचे राज्य विभागले जाणार नाही. त्याच्यासारखी त्याच्या राज्याला सत्ता मिळणार नाही का? कारण त्याचे राज्य हिसकावून घेतले जाईल व इतरांना दिले जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो उदयास आला न आला तोच त्याचे राज्य मोडून चार दिशांना त्याचे विभाग होतील; तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काहीएक येणार नाही, व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही; कारण त्याच्या राज्याचे उच्चाटन करून ते त्याच्या संततीस वगळून इतरांना देण्यात येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्यांना दिले जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तो उभा झाल्यावर त्याचे राज्य मोडून जाईल, चार दिशांत त्यांचे विभाग होईल; पण ते त्याच्या संततीला प्राप्त होणार नाही, आणि राज्य उपटले जाईल व ते त्यांच्याखेरीज इतरांस प्राप्त होईल.