Daniel 11:40 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अंतकाळी, दक्षिणेचा राजा उत्तरेच्या राजाशी लढेल. उत्तरेचा राजा त्याच्यावर चढाई करील. तो रथ घोडेस्वार आणि मोठमोठी गलबते घेऊन येईल व चढाई करील. तो पुराच्या लोढ्यांप्रमाणे येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अखेरच्या काळात दक्षिणेचा राजा त्याच्यावर हल्ला करेल आणि उत्तरेचा राजा वादळी झंझावातासारखा रथ, घोडेस्वार आणि पुष्कळ जहाजे घेऊन त्याच्यावर हल्ला करेल. तो अनेक देशांवर स्वार्या करेल आणि एखाद्या महापुराप्रमाणे त्यांच्यामधून निघून जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाजे घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसून टाकील.