Daniel 11:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग काही वर्षानी दक्षिणेचा राजा व तो सेनापती एक करार करतील.दक्षिपेच्या राजाची मलगी उत्तरेच्या राजाशी लग्र करील शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून ती असे करील.पण ती व दक्षिणेचा राजा पुरेसे शक्तिशाली नसतील. लोक तिच्याविरुध्द, तिला त्या देशात आणणाऱ्याविरुध्द तसेच अपत्य व तिला मदत करणारा या सर्वाविरुध्द उठतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नेमलेल्या वर्षांची मुदत भरल्यावर त्यांचा आपसात मिलाफ होईल; दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे करारमदार करण्यास जाईल; तथापि तिचे बाहुबल कायम राहणार नाही आणि तो व त्याचे बाहुबलही टिकणार नाही; तर त्या स्त्रीला ज्यांनी आणले, ज्याने तिला जन्म दिला व ज्याने त्या काळात तिला बल पुरवले त्यांच्यासह तिला इतरांच्या स्वाधीन करण्यात येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही वर्षानंतर जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपसात मिलाप करतील. दक्षिणेच्या राजाची मुलगी उत्तरेच्या राजाकडे कराराची खात्री करण्यास येईल पण तिचे बळ निघून जाईल व तिला सोडून देण्यात येईल ती आणि ज्यांनी तिला आणले ते तिचे वडील आणि तिला त्यावेळी मदत करणारा सोडून देण्यात येईल.