Daniel 12:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मला, दानीएलला दोन दुसरी माणसे दिसली एक नदीकाठी माझ्याजवळ उभा होता आणि दुसरा पैलथडीला उभा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी दानिएलाने पाहिले तेव्हा दुसरे दोन पुरुष, एक नदीच्या ह्या तीरास व दुसरा त्या तीरास असे उभे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी दानीएलाने पाहिले आणि तिथे दोघे उभे होते एक नदीच्या या काठवर उभा होता आणि दुसरा पलीकडील काठावर उभा होता.