Daniel 2:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने तुझ्याहाती नियंत्रण दिले आहे. म्हणून तू माणसे, हिंस्र प्राणी, पक्षी ह्यावर काबू ठेवतोस. ते जेथे कोठे असतील तेथे त्यांच्यावर देवाने तुझी सत्ता ठेवली आहे. नबुखद्नेस्सर राजा, तूच त्या पुतव्व्याचे सोन्याचे डोके आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जेथे जेथे मनुष्यजातीचा निवास आहे तेथील वनपशू व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत, त्या सर्वांवर आपणास सत्ता चालवण्यास दिली आहे; सुवर्णाचे शीर आपणच आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या हाताखाली त्यांनी सर्व मनुष्यप्राणी, भूमीवरील प्राणी आणि आकाशातील पक्षी निर्माण केले आहेत. ते जिथे कुठेही राहतात, त्यांनी तुम्हाला त्यांचा अधिपती म्हणून नियुक्त केले आहे. ते सोन्याचे मस्तक म्हणजे आपण स्वतःच आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने तुम्हास त्या जागा दिल्या जिथे माणसे राहतात. त्याने तुमच्या आधीन वनपशू आणि आकाशातील पक्षी केले आहेत आणि तुम्हास त्याचा शासक बनविले आहे, तुम्ही त्या पुतळ्याचे सुवर्ण मस्तक आहात.