Daniel 2:41 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा बनलेला होता, असे तुला दिसले. ह्याचा अर्थ चौथ्या राज्यात भाग असतील. तू लोखंड मातीत मिसळलेले पाहिलेस. म्हणजेच त्या राज्याला थोडे लोखंडासारखे बळ असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण त्या पुतळ्याची पावले व पावलांची बोटे पाहिली; त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता; तसे हे राज्य द्विविध होईल; तरी मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिले तशी त्या राज्यात लोखंडाची मजबुती राहील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे तुम्ही पाहिले की पाय आणि बोटे काही प्रमाणात भाजलेल्या मातीची होती आणि काही प्रमाणात लोखंडाची होती, म्हणून ते एक विभाजित राज्य असेल; तरीही त्यात काही लोखंडी ताकद असेल, जसे तुम्ही लोखंड मातीत मिसळलेले पाहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे आपण पाहिले की, पावले आणि बोटे काही भाग भाजलेल्या मातीचा आणि काही भाग लोखंडाचा होता, म्हणून हे राज्य विभागलेले राहील, काही भागात लोखंडाची मजबुती राहील तसेच जसे आपण लोखंड मातीत मिसळलेला पाहिले.