Daniel 2:47 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग राजा दानीएलला म्हणाला,” तुझा देव अती महत्वाचा व सामर्थ्यशाली आहे, ह्याची मला खात्री पटली. तो परमेश्वरच राजांचा राजा आहे, तो लोकांना अज्ञात गोष्टी सांगतो, हे खरेच आहे म्हणून तू रहस्याचा उलगडा करून देऊ शकलास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा दानीएलला म्हणाला, “निश्चितच तुझा परमेश्वर देवांचा देव आणि राजांचा प्रभू आणि रहस्ये उघड करणारा आहे, कारण तू या रहस्याचा अर्थ समजावून सांगण्यास योग्य ठरला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा दानीएलास म्हणाला, “खरोखर तुझा देव सर्व देवांचा देव आहे, राजांचा राजा आहे, तो जो रहस्यांचा उलगडा करतो, म्हणून तुला हे रहस्या प्रगट करता आले आहे.”