Daniel 4:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग काही काळापर्यंत दानीएल (म्हणजे बेल्टशस्सर) एकदम गप्प झाला. तो या गोष्टीचा त्याच्या मनात विचार करीत राहिला ते पाहून राजा म्हणाला,”बेल्टशस्सर (दानीएल) मला स्वप्नचा अर्थ सांगताना घाबरू नकोस. मग बेल्टशस्सर (दानीएल) राजाला म्हणाला,”हे स्वामी इडापिडा टळो! हे स्वप्न तुझ्या शत्रूंच्या संदर्भात असायला हवे होते. आणि त्या स्वप्नाचा अर्थ तुझ्या विरोधात असणाऱ्यांच्या संदर्भात असायला हवा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग बेल्टशस्सर हे नाव दिलेला दानीएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, “बेल्टशस्सरा, ह्या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बेल्टशस्सराने म्हटले, “माझे स्वामी, हे स्वप्न आपल्या द्वेष्ट्यांना व त्याचा अर्थ आपल्या वैर्यांना लागू पडो!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर दानीएल (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जात), काही वेळेसाठी व्याकूळ झाला आणि त्याचे विचार त्याला भयभीत करू लागले. म्हणून राजा म्हणाला, “हे बेलटशास्सर, माझे स्वप्न किंवा त्याचा अर्थ यामुळे भयभीत होऊ नको.” तेव्हा बेलटशास्सराने (अर्थात् दानीएलाने) उत्तर दिले, “महाराज, जर हे स्वप्न तुमच्या शत्रूंवर आणि त्याचा अर्थ तुमच्या विरोधकांवर ओढवला असता, तर किती बरे झाले असते!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दानीएल, ज्यास बेल्टशस्सर नाव देण्यात आले होते तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, “बेल्टशस्सर हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बोलटशस्सर म्हणाला, “माझ्या स्वामी हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि याचा अर्थ तुझा शत्रुस लागू पडो.