Daniel 4:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या गोष्टी ताबडतोब घडल्या नबुखद्नेस्सरला सक्तीने लोकांपासून दूर जावे लागले. त्यायाला गुरांप्रमाणे गवत खावे लागले. तो दवात भिजला. त्याचे केस गरूडाच्या पिसांप्रमाणे लांब वाढले,व नखे पक्ष्याच्या नखांप्रमाणे वाढली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच घटकेस हे नबुखद्नेस्सराच्या प्रत्ययास आले; त्याला मनुष्यांतून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला; त्याचे शरीर आकाशातल्या दहिवराने भिजू लागले; येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नबुखद्नेस्सरबद्दल जे बोलण्यात आले होते ते त्याच घटकेला पूर्ण झाले. त्याला लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर दवाने भिजून ओलेचिंब झाले, त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे लांब वाढले आणि पक्ष्यांच्या नखांसारखी त्याची नखे वाढली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.