Daniel 4:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीवरचा मनुष्यप्राणी खरच महत्वाचा नाही. स्वर्गीय सामर्थ्यांत व पृथ्वीवरच्या माणसांत देवाच्याच इच्छेने सर्व काही घडते त्याच्या सामर्थ्यशाली हाताला कोणी अडवू शकत नाही. त्याच्या कृत्यांबद्दल कोणी त्याला प्रश्न विचारू शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीवरील सर्व लोक कवडीमोलाचे आहेत. स्वर्गातील शक्तींमध्ये आणि पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये त्यांना जे योग्य वाटते तेच ते करतात. त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही अथवा त्यांना बोलू शकत नाही: “तुम्ही हे काय केले?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भूतलावरील सर्व रहीवासी त्यास शुन्यवत आहेत. तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे, भूतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो, कोणीही त्यास थांबवू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की “तू हे का केले?”