Daniel 5:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्याला सक्तीने लोकांपासून दूर करण्यात आले.त्याचे हदय पशूप्रमाणे झाले. तो जंगली गाढवांबरोबर राहिला व त्याने गाईप्रमाणे गवत खाल्ले. तो दवात भिजला तो धडा शिकेपयैत त्याला हे भोगावे लागले. मगच त्याला पटले की मनुष्याच्या राज्यावर परात्पर देवाचे प्रभुत्व असते, परात्पर देवाच्या इच्छेप्रमाणे राज्याचा राजा ठरविला जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला मनुष्यांतून घालवून देण्यात आले; त्याचे हृदय पशूंसारखे झाले; तो रानगाढवांमध्ये वस्ती करू लागला; तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे शरीर आकाशातील दहिवराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्याला स्थापतो, असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि प्राण्याचे मन देण्यात आले; ते रानगाढवांमध्ये राहिले आणि बैलासारखे गवत खात असत; आणि त्यांचे शरीर आकाशाच्या दवबिंदूंनी भिजले होते, जोपर्यंत त्यांनी हे मान्य केले नाही की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि त्यांना पाहिजे त्याला ते राज्यांचा अधिपती म्हणून नियुक्त करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास मानवातून हाकलून देण्यात आले. त्याचे हृदय पशूसारखे झाले आणि तो रानगाढवात राहीला. तो बैलासारखे गवत खाई, व त्याचे शरीर दवाने भिजत असे. मानवी राज्यावर सर्वोच्च देवाची सत्ता आहे व तो पाहीजे ते त्याने स्थापीत करतो हे ज्ञान त्यास प्राप्त होईपर्यंत तो असा राहिला.