Daniel 5:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून यरुशललेमच्या देवाच्या मंदिरातून आणलेले सोन्याचे प्याले त्यांनी आणले.राजा, दरबारी, राण्या व दासी हे त्यातून मद्य प्यायले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यरुशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्रस्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले; राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणण्यात आली आणि राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ लागली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा सेवक सोन्याची ती पात्रे घेवून आले, जी यरूशलेमेतील देवाच्या मंदीरातून आणलेली होती. मग राजा त्याचे सरदार, त्याच्या पत्नी त्याच्या उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली.