Daniel 6:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या 120 प्रांताधिकाऱ्यांवर (सत्रपांवर) लक्ष ठेवण्यासाठी त्याने जे तीनजण नेमले, त्यातील एक दानीएल होता. कोणी राजाला फसवू नये व राज्याचे काहीही नुकसान होऊ नये म्हणून दारयावेशने तिघांची नेमणूक केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यावर तीन अध्यक्ष नेमले, दानीएल त्यांपैकी एक होता; राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांता-धिकार्‍यांनी आपला हिशोब त्या तिघांना द्यावा असे ठरवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
व त्यांच्यावर तीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यामध्ये दानीएल एक होता. राजाला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये म्हणून प्रांताधिकार्‍यांनी त्यांना हिशोब द्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्यावर तीन मुख्यप्रशासक होते. त्यापैकी एक दानीएल होता. या प्रशासकांची नेमणूक यासाठी होती की राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना हिशोब द्यावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.