Daniel 6:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दानीएल दुसऱ्या दोघांपेक्षा उजवा ठरला. कारण दानीएलचे चारित्र्य चांगले होते व त्याच्याजवळ प्रचंड क्षमता होती. दानीएलची राजावर इतकी छाप पडली की सर्व राज्याचा कारभार त्याच्या हाती सोपविण्याचा बेत त्याने केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दानीएल त्या अध्यक्षांत व प्रांताधिकार्‍यांत श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठायी उत्तम आत्मा वसत होता; त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दानीएल हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यापेक्षा त्याच्या विलक्षण गुणांमुळे सरस असल्यामुळे शासक म्हणून त्यालाच संपूर्ण साम्राज्यावर नेमावे अशी राजाची योजना होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दानीएल त्या प्रशासक व प्रांताधिकाऱ्यांत श्रेष्ठ ठरला कारण त्याच्यामध्ये उत्तम आत्मा वसत होता. राजा त्यास सर्व राज्यावर नेमण्यासाठी योजना करत होता.