Daniel 6:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण इतर दोघा पर्यवेक्षकांना आणि सर्व प्राताधिकाऱ्यांना (सत्रपांना) ह्या बेताविषयी कळताच ते दानीएलचा द्वेष करू लागले. दानीएलला दोष देण्यासाठी काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्यासाठी दानीएल राज्यकारभार करताना ज्या ज्या गोष्टी करी त्या त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी नजर ठेवली. पण त्यांना दानीएलची चूक सापडली नाही. त्यामुळे ते दानीएलला दोषी ठरवू शकले नाहीत. दानीएल अतिशय प्रामाणिक व विशवासू होता. क्ष्याने राजाला फसविले नाही. तो अतिशय कष्ट करीत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे असता राज्यकारभारासंबंधाने दानिएलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकार्यांनी चालवला; पण त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना; कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यामुळे अध्यक्ष आणि प्रांताधिकारी दानीएलविरुद्ध राज्य कारभारातील दोष शोधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार आढळला नाही, कारण तो विश्वासू होता आणि तो भ्रष्ट नव्हता किंवा निष्काळजीपणाही करीत नव्हता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे असताना इतर मुख्य प्रशासक आणि प्रांतिधिकारी हे दानीएलात चूक शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण तो विश्वासू असल्याने त्यांना त्याच्यात काहीच चूक सापडली नाही.