Daniel 7:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा राजा परात्पर देवाच्या विरुद्ध बोलेल. तो देवाच्या खास माणसांना दुखवेल व ठार मारील. आधीचे कायदे या काळ बदलायचा तो प्रयत्न करील. देवाचे खास लोक एक वेळ, अनेक वेळा व अर्धा वेळ. त्याच्या सत्तेखाली राहातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; तो नेमलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील; एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो परमोच्च परमेश्वराच्या विरुद्ध बोलेल आणि त्यांच्या पवित्र लोकांवर अत्याचार करेल आणि निर्धारित वेळ आणि कायदे बदलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र लोक एक वेळ, दोन वेळा आणि अर्धा वेळ त्याच्या हातात देण्यात येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल, आणि देवाच्या पवित्र जनांचा छळ करील नेमलेले सण आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील. या सर्व गोष्टी त्याच्या हातात तिन वर्षे आणि सहा महिण्यासाठी दिल्या जातील.