Daniel 7:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पहिला प्राणी सिंहासारखा होता व त्याला गरुडासारखे पंख होते. मी त्या प्राण्याचे निरीक्षण केले. त्यानंतर त्याचे पंख कापण्यात आले. तो जमिनीपासून वर उचलला गेला होता. त्यामुळे तो माणसारसाखा जमिनीवर दोन पायांवर उभा राहिला होता. त्याला मानवी हदय (मन) देण्यात आले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पहिला पशू सिंहासारखा होता आणि त्याला गरुडाचे पंख होते. मी पाहत असतानाच त्याचे पंख उपसून काढण्यात आले आणि त्याला जमिनीवरून उचलून माणसासारखे दोन पायांवर उभे करण्यात आले आणि त्याला मानवाचे अंतःकरण देण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते. असा मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्यास जमिनीवर मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय देण्यात आले होते.