Daniel 7:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मी त्या शिंगाबद्दल विचार करीत असतानाच, त्या शिंगामध्ये आणखी एक शिंग उगवले. ते लहान होते, त्या शिंगावर माणसाच्या डोव्व्याप्रमाणे डोळे व तोंड होते. ते तोंड प्रौढी मिरवीत होते. त्या लहान शिंगाने तीन इतर शिंगे उपटून टाकली. चवथ्या प्राण्याचा न्यायनिवाडा
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“या शिंगांविषयी मी विचार करीत असता, त्या शिंगांमध्ये आणखी एक लहान शिंग उगवले आणि आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगांना या नव्या शिंगाने मुळासकट उपटून टाकले. या शिंगाला माणसासारखे डोळे होते आणि बढाई करणारे तोंडही होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी ती शिंगे पाहत असतांना, मग त्यांच्यातून आणखी लहान शिंगे निघाले आणि आधिच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होते आणि मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते.