Daniel 8:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“हा राजा खूप शक्तिशाली होईल पण स्वत:च्या बळावर नव्हे, तो भयंकर संहाराला कारण होईल तो करील त्या प्रत्येक गोष्टीत त्याला यश मिळेल. तो सामर्थ्यवान लोकांचा, देवाच्या खास लोकांचासुध्दा नाश करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची सत्ता बलवत्तर होईल; तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही; तो विलक्षण नाश करील. तो उत्कर्ष पावेल आणि आपला मनोरथ सिद्धीस नेईल; तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचे सामर्थ्य मोठे असेल, पण ते त्याचे स्वतःचे नसेल. तो भयंकर नाश करणार आणि जे काही तो करेल, त्यामध्ये त्याला यश मिळेल. जे बलवान आणि पवित्र आहेत अशा लोकांचा तो नाश करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याची सत्ता महान होईल पण ती त्याच्या स्वबळाने नाही तो दूरपर्यंत पोहचणारा विनाश करील तो जे काही करील त्यामध्ये त्याचा विकास होईल तो पवित्र व बलवानांचा नाश करील.