Daniel 9:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या देवा, माझा धावा, ऐक. डोळे उघडून आमच्यावर आलेली भयानक संकटे पाहा. तुझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या नगरीची काय अवस्था झाली आहे ती पाहा.”आम्ही चांगले आहोत” असे मी म्हणत नाही. त्याकरिता मी ह्या गोष्टी मागत नाही, तर तू दयाळू आहेस हे मला ठाऊक आहे म्हणून मी तुझ्याकडे ह्या गोष्टी मागत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे माझ्या देवा, कान दे, ऐक; आपले नेत्र उघडून आमचा झालेला विध्वंस पाहा व तुझे नाम ज्या नगरास दिले आहे ते पाहा; आम्ही आपल्या विनवण्या आमच्या नीतिमत्तेस्तव नव्हे, तर तुझ्या विपुल करुणांस्तव तुझ्यापुढे मांडतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे आमच्या परमेश्वरा कान द्या आणि ऐका; आपले डोळे उघडा आणि ज्या नगरास तुमचे नाव दिले आहे ते कसे उद्ध्वस्त झाले आहे ते पाहा. आम्ही नीतिमान आहोत म्हणून विनवणी करीत आहोत असे नाही, परंतु तुमची दया विपुल आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवा ऐक, देवा क्षमा कर, देवा लक्ष दे आणि कार्य कर तुझ्या नावासाठी उशीर करू नको, माझ्या देवा, कारण तुझ्या शहरास आणि तुझ्या लोकांस तुझे नाव दिले आहे. कारण आम्ही आपल्या न्यायीपणामुळे आपल्या विनंत्या तुझ्यापुढे ठेवतो असे नाही, तर तुझ्या अपार दयेमुळे त्या तुझ्यापुढे ठेवतो.