Daniel 9:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वरा, आम्हा सर्वांना लाज वाटली पहिजे. आमच्या सर्व राजांनी नेत्यांनी आणि आमच्या पूर्वजांनी लाजेने मान खाली घातल्या पाहिजेत. का? कारण परमेश्वरा, त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे प्रभो, आमच्या तोंडांस, आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील ह्यांच्या तोंडांस काळोखी लागली आहे. कारण आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह, आम्ही, आमचे राजे, आमचे राजपुत्र, आणि आमचे पूर्वज फार लज्जित आहोत, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा आमच्या तोंडाला काळे लागले आहे कारण आमचे राजे, आमचे सरदार आणि पूर्वज आम्ही सर्वांनी तुझ्या विरोधात पाप केले आहे.