Deuteronomy 1:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोणालाही कमी अधिक लेखू नका. सर्वांना समान लेखा. कोणाचीही भीती बाळगू नका. कारण तुम्ही दिलेला न्याय हा देवाचा आहे. एखादे प्रकरण तुम्हाला विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
न्याय करताना पक्षपात करू नका, लहानमोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या; कोणाचे तोंड पाहून भिऊ नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे; एखादे प्रकरण तुम्हांला विशेष अवघड वाटले, तर ते माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी ते ऐकेन.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
न्याय करताना पक्षपातीपणा दाखवू नका; लहान व मोठे यांचे म्हणणे समानतेत ऐकून घ्या. कोणालाही घाबरू नका; कारण न्याय हा परमेश्वराकडूनच असतो. ज्या तक्रारी तुम्हाला सोडविण्यास कठीण वाटतील, त्या माझ्याकडे आणा आणि मी ऐकेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हास विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.