Deuteronomy 1:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग तुम्ही मला म्हणालात की आमच्या हातून पाप घडले आहे. आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू. मग तुम्ही शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झालात. तो डोंगराळ भाग सर करणे सहज जमेल असे तुम्हांला वाटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तुम्ही मला असे उत्तर दिले की, ‘आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, तरी आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू;’ आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपली युद्धाची शस्त्रे धारण केली आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशात चढून जाण्यास तयार झालात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा लोकांनी कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे; आम्ही आमच्या वचनदत्त देशात जाऊ व तो मिळविण्यासाठी याहवेह परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढाई करू.” असे म्हणून त्यांना आपली शस्त्रे सरसावली. त्यांना वाटले की हा सर्व डोंगराळ प्रदेश आपण सहज जिंकून घेऊ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तुम्ही मला असे उत्तर दिले की “आमच्या हातून परमेश्वराविरुध्द पाप घडले आहे आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू.” मग प्रत्येक मनुष्याने आपली शस्त्रास्त्रे घेतली. आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशावर चढावयला तयार झाला.