Deuteronomy 10:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या पेटीत ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी मागे फिरून पर्वतावरून खाली उतरलो आणि मी बनवलेल्या कोशात त्या पाट्या ठेवल्या; परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे त्या तेथेच आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर मी पर्वतावरून खाली उतरलो आणि याहवेहने मला आज्ञा दिल्याप्रमाणे त्या पाट्या मी बनविलेल्या लाकडी कोशात ठेवून दिल्या; आजपर्यंत त्या तिथेच आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.