Deuteronomy 11:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तसे केलेत तर परमेश्वराचा कोप होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यात तुम्हांला लौकरच मरण येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील, म्हणजे पाऊस पडणार नाही; भूमी आपला उपज देणार नाही; आणि जो उत्तम देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यातून तुमचा त्वरित नायनाट होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसे केल्यास याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते आकाशकपाटे बंद करतील, मग पाऊस पडणार नाही, भूमी आपला हंगामही देणार नाही आणि याहवेहने तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तुम्ही त्वरित नाश पावाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसे केलेत तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हास देत आहे त्यामध्ये तुम्हास लवकरच मरण येईल.