Deuteronomy 12:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वर एक ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्याला तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा-होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा, परमेश्वराला अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशुपक्षी यांचा पहिला गोऱ्हा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हांला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा: आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हाच तुम्ही तुमची सर्व होमार्पणे, यज्ञार्पणे, दशांश, नवसाची अर्पणे व स्वेच्छार्पणे—याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच्या नावाचे निवासस्थान म्हणून ज्या ठिकाणाची निवड करतील तिथे आणावीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तुमचा देव परमेश्वर एका ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्यास तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा; होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा, परमेश्वरास अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशु-पक्षी यांचा पहिला गोऱ्हा, घेऊन जा.