Deuteronomy 13:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करुन शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करुन टाका. तो आपल्या परमेश्वराचा होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधी ही वसवता कामा नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू त्या नगरातील सर्व लूट चवाठ्यावर जमा करावीस, आणि ते नगर त्यातल्या लुटीसह आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सर्वस्वी जाळून नष्ट करावेस; त्याचा ढिगार कायमचा तसाच पडू द्यावास; ते पुन्हा वसवू नयेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर युद्धात मिळालेल्या लुटीचा नगरातील रस्त्याच्या मधोमध ढीग करून त्याला आग लावावी आणि ते संपूर्ण नगर होमार्पण म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वराला अर्पण करावे. हे नगर म्हणजे एक उजाड ठिकाण म्हणून कायम राहील. ते पुन्हा कधीही बांधले जाणार नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करून शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करून टाका. ते तुमचा देव परमेश्वर याचे होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधीच वसवता कामा नये.