Deuteronomy 17:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एखादे खुनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हाला आवाक्या बाहेरचे वाटेल. या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल. अशा वेळी परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या गावात रक्तपात किंवा मारहाण ह्या बाबतीत वाद उपस्थित होऊन त्याचा निर्णय करणे तुझ्या आवाक्याबाहेर असले तर लगेच तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानी जा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या न्यायालयात खटले येतात, ज्यांचा निवाडा करण्याचे काम तुमच्या आवाक्याबाहेरचे असेल—मग ते रक्तपात असो, फिर्याद अथवा मारामारी असोत—याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुम्ही तो वाद न्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखादे खूनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हास आवाक्याबाहेरचे वाटेल, या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल, तेव्हा परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे.