Deuteronomy 18:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे; तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे; तू त्याची भीती बाळगू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर एखाद्या संदेष्ट्याने याहवेहच्या नावाने ज्या गोष्टीची घोषणा केलेली असेल, ती गोष्ट जर घडून आली नाही किंवा खरेच तसे होत नसेल तर तो संदेश याहवेहने दिलेला नाही. तो संदेष्टा उन्मत्तपणे बोलला आहे, तुम्ही त्याचे भय बाळगू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्यक्षात घडले नाहीतर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हते, तर तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्यास तुम्ही घाबरायचे कारण नाही.